खरंय.  आम्ही दबंग पाहिला!  का? तर तो एवढा हीट का झाला..  सल्लुमिया.... कथानक शुन्य... दिग्दर्शन ... शुन्य.. प्रेक्षणीय स्थळे... गरजच नाही.  रोबोट = रजनीकांत. मराठीत नायक/नायिका आहे का कोणी ज्याच्या/जिच्या नावावर चित्रपट चालेल? हेच विधान नाटकासाठी लागू पडत नाही. सध्या मी छत्तीसगढमध्ये आहे. दोन महिन्यापूर्वी तिथे दोन छत्तीसगढी चित्रपट प्रदर्शित झाले, आणि दोन्ही हीट झाले. ९०% चित्रपटगृहात(मल्टीप्लेक्ससहीत) हेच दोन चित्रपट. त्यांना (छत्तीसगढी लोकांना) कुठेही आरडा-ओरडी करावी लागली नाही चित्रपटगृहांसाठी. एकदा सुमित्रा भावेंशी चर्चा झाली आपला मुख्य प्रश्न आहे .. पैसा. हिंदीशी तुलना आपण करुच शकत नाही. ते जेवढा पैसा निर्मितीवर करतात तेवढाच प्रमोशनवर.  तीन आठवडे सगळ्या रियालिटी शोवर  सलमान-सोनाक्षी दिसत होते. तुमचा आशावाद खरा ठरो..