मराठी सिनेमांवर मराठी नाट्यकलेचा बराच प्रभाव आहे असे जाणवते. त्यामुळे एकूण मांडणी काहीशी संयत, मात्र तुलनेने आशयघन असते. (कॉमेडीपट क्षमस्व !) हिंदीसारखे किंवा दक्षिणेसारखे भडक चित्रपट आपल्याला परवडत नाहीत, मानवतही नाहीत. त्यामुळे ढेरपोट्या अंकुश चौधरीचा दबंग किंवा विदूषकी भरत जाधवाचा रोबोट पाहण्यापेक्षा मला वर्षातून तीन-चार श्वास/उत्तरायण/नटरंग/जोगवा/विहीर पहायला आवडतील.