आपला सिनेमास्कोप येथे हे वाचायला मिळाले:
किक-अॅस पाहताच पडणारा पहिला प्रश्न म्हणजे या चित्रपटाचा खरा प्रेक्षक कोण? सुपरहीरो मायथॉलॉजी हा या चित्रपटाचा एक महत्त्वाचा आणि अविभाज्य भाग आहे. या मायथॉलॉजीशी तुमची जवळीक जितकी अधिक, तेवढा तुम्हाला चित्रपट अधिक पटेल. बारीकसारीक संदर्भापासून मूलभूत रचनेपर्यंत अनेक गोष्टी कुठून आल्या, त्या कोणत्या दृष्टिकोनातून वापरल्या जातायत आणि त्यातून दिग्दर्शक काय सुचवतोय हे तुमच्या चटकन लक्षात येईल. पण त्यामुळे हा मुलांचा चित्रपट ठरणार नाही. मुलांना तो पाहायला जरूर आवडेल. पण जागरूक पालक त्यात दिसणा-या हिंसाचाराचं डोकं चक्रावून टाकणारं प्रमाण पाहाता ...