"सत्यमेवजयते" आपण काही चांगले मुद्दे लिहिले आहेत, पण त्यातले बरेचसे मुद्दे हिंदीलाही लागू पडतील. स्टॅटिस्टिक्सचा विचार केला तर एकूण बनणारे पिक्चर आणि "चालणारे" किंवा हिट होणारे ह्यांचं प्रमाण मराठी आणि हिंदी मध्ये सारखंच असावं असं वाटतं. मराठी कडे पैसा नाही म्हणून चांगले चित्रपत बनत नाहीत, हे म्हणजे नाचता येईना... आहे. शाहिस्तेखान यांनी दिलेल्या चांगल्या चित्रपटांच्या यादी मधल्या पिक्चरचं बजेट जास्त होतं म्हणून ते हिट झाले का?
मराठी पिक्चर हिंदी ची कॉपी करतात हे आपलं विधान देखिल न पटणारं आहे, उलट हिंदीनेच मराठी मधून उचललेली उदाहरणं असतील.
(कदाचित हे चूकीचं असू शकेल, पण हिंदीमध्ये नेहेमीच सगळीकडून विशेषतः दाक्षिणात्य चित्रपट कॉपी करण्याची प्रथा आहे.)
तुम्ही चित्रपट हे कला आणि धंदा ह्या दोन्ही बाजूनी लिहिलं आहे, धंद्याच्या दृष्टिकोनातून विचार करायचं असेल तर कॅपिटल कमी म्हणून नफा कमी त्यामुळे कलाकारांना मिळणारं मानधन कमी हे समजू शकतो, पण कला निर्मितीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर पैशाचा प्रॉब्लेम नसावा, म्हणजे, पैसे नाहित त्यामुले चांगला कॅमेरा नाही त्यामुळे चित्रण निकृष्ट दर्जाचं होतं वगैरे अशातला भाग नसावा.
एकूणात अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारेच अधिक असतात आणि ते तसे सगळीकडेच असतात त्यामुळे ....