मला तरी असं वाटतं हल्ली दर्जेदार साहित्य निर्माण होत नाही. झाले तरी त्याचा चित्रपट, नाटक अथवा दूरदर्शन मालिका,
बनविण्यासाठी उपयोग केला जात नाही. लेखक, नट आणि इतर कलाकार या व्यवसायातील   विशिष्ट वर्तुळांशी संबंधित असतील तरच
त्यांना संधी मिळते. चांगलं साहित्य जरी वापरलं गेलं तरी ते मूळ लिखाणाशी किती मिळतेजुळते असेल हे सांगणं कठीण (नाहीतर ते
बाहेर फेकलं जाईल ना). त्यामुळे दर्जाहीन लेखन त्याच त्याच वर्तुळांमध्ये फिरत राहते. नवीन माणसाला शक्यतोवर आत येऊ न देणं
मान न देणं व आल्यास कधी कधी त्याची फसवणूक करणं ही सुद्धा काही मराठी माध्यमे मागे पडण्याची  कारणे असू शकतील. आता
नवीन कलाकार लेखकांनी स्वतःची अशी वर्तुळे निर्माण केली तर निदान काही दिवस तरी (म्हणजे ते जोपर्यंत बिघडत नाहीत तोपर्यंत)
चांगल्या कलाकृतींचा आस्वाद घेता येईल असे वाटते. तरीही काही कलाकृती चालू पद्धतींच्या तोंडात मारून पुढे आल्या आहेत. असो.
दर्जा सुधारण्याची वाट पाहण्याशिवाय आपण प्रेक्षक काहीही करू शकत नाही.