बातमी वाचून राग येणे स्वभविक आहे.
परंतु माझ्या माहितीतील एका शेतकरी कुटुंबाकडून मागे एकदा हकीकत समजली होती, ती अशी की असे टॉमेटो वाहून न्यायला जेवढा खर्च येतो, तेवढाही भाव मिळाला नाही तर काय करणार? मग वाहून तरी कशाला न्यायचे! असा विचार उद्विग्न मनस्थितीत न आला तरच नवल.
तेंव्हा मला अजून एक धक्कादायक गोष्ट समजली होती ती अशी, की आपण जेव्हा साठ रुपये किलो ( घासाघीस करून पन्नास, पंचावन्न रुपये किलो) झेंडूची फुले घेतो (एकदम किलो घेतल्याने कसे पाच रुपये वाचले अशी स्वतःची पाठ थोपटून घेतो), तेंव्हा ती शेतकऱ्याकडून चार-साडेचार रुपये किलो ने आलेली असतात! (ही अतिशयोक्ती नाही!)
यामधला फायदा हा सर्व व्यापाऱ्यांच्या साखळीचा असतो!
आणि राहता राहिले "पॅकेज", वीज माफी वगैरे... यापैकी घोषणा किती, अंमलबजावणी किती आणि खरोखर किती जणांना ते मिळू शकते हा स्वतंत्र संशोधनाचा विषय व्हवा.
अर्थात तुम्ही म्हणता त्या बातमीतील टॉमेटो उत्पादक हा मी वर नमूद केलेल्या गटातील असेलच असे नाही; आणि त्या परिस्थितीत राग येणं स्वाभाविक आहे. पण यात सरसकट सर्वांना समान ठरवून सुक्याबरोबर ओलेही जळत नाही ना ते बघावे...