लिहायला मिळते म्हणून काहीपण लिहिणार? पैसा कुणाला नको? माल बाजारात आणला तो काय फेकून द्यायला?
जरा विचारा करा, माल फेकताना काय त्रास जाला असेल? रात्रभर झोपला नसणार शेतकरी.
टॉमेटोसाठी तार लावताना किती कापते? माहिती आहे?
फुकट पेक्षा नक्कीच बरं असणार ना?
म्हणून काय कुठल्या पण भावने देणार आणि तुम्ही टॉमेटो स्वस्त म्हणून डबल सूप पिणार. वा!
पॅकेजेस आणि कर्जमाफी वीज माफी??
पॅकेज दिली की शेतात आपोआप पीक येते :-) एक काम करा, पॅकेजेस आणि कर्जमाफी द्या आणि माल फुकट घ्या. मजा करा
गेली चार वर्ष मनोगत वाचत आहे पण असला घाण प्रकार पहिल्यांदा वाचला. कुणीतरी बातमी देणार आणि तुम्ही ह. खो. म्हणणार. शेतकऱ्याला बाजार नाही पटला अन त्याचा माल त्यानं फेकला. तुम्ही का शिव्या घालता?