"याचे सगळ्यात महत्वाचे कारण म्हणजे, मराठी माध्यमात जाणारी बहुतेक मुले अभ्यासात मंद असतात म्हणून तिकडे जातात,  मराठीवरील प्रेमाने नाही.  (आपल्यासारखे   जाणीवपूर्वक मुलांना मराठीला पाठवणारे फ़ारच थोडे पालक असतिल)."

मी ह्याच्या विरोधात आहे. तुमचे म्हणणे पटते की मराठी शाळाच कमी आहेत. पण ह्याचा अर्थ हा नाही की फक्त मंद मुलेच मराठी शाळेत जातात. इंग्रजी माध्यमातीलही बहुतेक मुले मंद असतात. हो, हेही बरोबर असेल की काही काही जण तर फक्त भितीनेच मुलांना इंग्रजी शाळेत पाठवितात. पण त्या मुलाला इंग्रजी पूर्णपणे कळते का हाही वेगळा मुद्दा आहे. प्रश्न माध्यमाचा नसेल...
बहुधा माझ्या मते प्रश्न आहे मराठी भाषा ह्या विषयाचा. आणि बाकीचे विषय उदा. गणित, शास्त्र हे मराठी आणि इंग्रजी भाषेत सारखेच असतील ना? जर नाही तर मग ती आपल्या शिक्षण मंडळाची चूक आहे.

-देवदत्त