संग्राहक भाऊ,

कच्च्या मातृभाषेचा प्रश्न गंभीर आहे खरा.

कविता, लघुनिबंध आदि गोष्टींचा अंतर्भाव अभ्यासात करावा का?

होय.

मराठीत मार्क देताना व्याकरण, शुद्धलेखन ह्याकडे पाहावे का?

होय.

मुळात मराठी हा विषय परीक्षेला असण्याची काय आवश्यकता आहे?

विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासात मातृभाषेवर अथवा प्रथमभाषेवर प्रभुत्व आवश्यक.

मराठीत मार्क कमी मिळाले तर काय बिघडते?

आर्थिकदृष्ट्या काही नाही. सांस्कृतिक दृष्ट्या सर्वकाही.

तिकडे इतके लक्ष का द्यावे असे वाटते?

ज्या भाषेत मूल लहानाचे मोठे झाले, विचार करायला शिकले तीच भाषा मुलाला येत नसेल तर नजीकच्या भविष्यात सामाजिक स्वास्थ्यात बाधा येऊ शकते असे वाटते.

आपल्या नावात 'टाइम्स'सारखे परके शब्द मिरविणारी मराठी वृत्तपत्रेदेखील ह्या ऱ्हासास कारणीभूत आहेत असे वाटते.

आपला
(मातृभाषिक) प्रवासी