मी टोमॅटो फेकून देण्याचं समर्थन मुळीच करत नाहीय.

फेकून देण्यापेक्षा दान करणे कधीही श्रेष्ठच... मुद्दा समजून घ्या उगीच विरोध करायचा म्हणून विरोध नको!!

याला माझं १००% समर्थन. पण समजा टमाट्याचा एक क्रेट पिकवायला खर्च येतोय १५० रुपये आणि उच्च प्रतीच्या टमाट्याला भाव मिळतोय १०० रुपये. मग दुसऱ्या दर्जाचा माल कोण घेणार ? तो माल तसाच पडून राहिला तर नुकसान आहेच. पण भावच मिळत नसेल तर त्याने ते टमाटे दान करण्यासाठीतरी पैसे का खर्च करावे, असा विचार त्याच्या मनात येत नसेल का ? नुकसान झालं तितकं पुरे झालं असा विचार त्याने केला तर काय चुकले ?

सकाळने (किंवा इतर कोणी) नुसती बातमी छापण्यापेक्षा तुम्ही म्हणता तसं पुढाकार घेऊन काहीतरी करायला हवे होते. शेवटी दानही करणारा भरल्या पोटीच करतो ना ? याचा विचार व्हावा हिच अपेक्षा.