कांदा - २ प्रकार, बटाटा, घोसाळे,  मायाळूची पाने, फ्लॉवर, कोबी, वांगी, भोपळी मिरची, सुरण, आमचेकडे गोव्यास आळूची माडी हा एक वेगळा प्रकार आहे.  अशी अनेक प्रकारची भजी करता येतात  पैकी मायाळूची पाने हल्ली मिळत नाहीत.  कोणती चविष्ट ही प्रत्येकाची आवड.  पकोड्यांचे म्हणाल तर मला वाटते हिंदीत भजी म्हणजे पकोडा.  वडा पाव विषयी म्हणाल तर थोडी तिखट अशी ओली चटणी पावाला दोन्ही तुकड्यांना लावून मध्ये जरा लहानसा वडा ठेवून त्याचा टोस्टरमध्ये टोस्ट केल्यास जरा वेगळे वाटेल.