बर्गरला अमेरिकन वडापाव म्हणा हवे तर, पण वास्तवात वडापावसारख्या साध्यासोप्या आणि चविष्ट पदार्थाची बर्गरशी तुलनाच होऊ शकत नाही. बर्गरमधील पॅटी हा तद्दन भिकार प्रकार असतो. शिवाय ते व्हाईट सॉस आणि सॅलडमुळे चव आणखी बिघडते. त्यातल्या त्यात आकर्षक भाग म्हणजे पांढऱ्या तीळाची छान नक्षी असलेले ते दोन गोल पाव.

त्यापेक्षा आपला लुसलुशीत चौकोनी पाव असावा, त्याला आतून आले-लसूण-लाल ठेच्याची ओली चटणी फासलेली असावी. (कोरडी चटणी खाली सांडते) बटाटेवड्याचे वरचे आवरण पातळ असावे आणि तोंडी लावायला मिठाच्या पाण्यात उकडलेली हिरवी मिरची (किंवा तळलेली पण चालेल) असावी. असे दोन वडापाव हाणावेत, हुळहुळत्या तोंडावर फुंकर म्हणून अमृततुल्यचा कटिंग चहा मारावा आणि पुढे चालू पडावे.

दुबारा मत पूछना 'सुख म्हणजे नक्की काय असतं? ' :)