<<याचे सगळ्यात महत्वाचे कारण म्हणजे, मराठी माध्यमात जाणारी बहुतेक मुले अभ्यासात मंद असतात म्हणून तिकडे जातात>>

समस्त मराठी भाषिकांचा आणि मराठी भाषेचा तसेच मराठी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा घोर अपमान करणाऱ्या या अविवेकी विधानाचा त्रिवार निषेध!

लेखिकेने एकदा डोळे उघडून शालांत परिक्षेची गुणवत्ता यादी पहावी हे बरे. मराठी माध्यमातले विद्यार्थी 'ढ' असतात असे विधान कशाच्या आधारे केले आहे ते लेखिकेने सविस्तर सांगावे.

मराठीची बदनामी व उपहास स्वतःला 'मराठीप्रेमी' असे बिरुद लावून घेणाऱ्या व्यक्तिने करावी यापरते मराठीचे दुर्दैव कोणते?