... शरीर हा आपला लेख आवडला. साध्या आणि सरळ भाषेत लिहलेले लेखन तर छानच. कोणाला काय आवडते आणि कोणाला काय नाही, अशी प्रत वारी करून लिखाण करण्याचा तुमचा जो मानस आहे कृपया तो बदलावा वि. वि. तुमच्या जवळ जे आहे ते तुम्ही द्यावे काय हवे काय नको हे घेणाऱ्याने ठरवावे. केवळ प्रतिसादावर लिखाण अवलंबून नसावे असे मला वाटते. अधिक उण्यासाठी क्षमस्व!...
धन्यवाद!
पहिल्या लेखात मी माझं आकलन विशद करतो, मग ते माझ्या चाहत्यांपर्यंत पोहोचलं की नाही हे मला त्यांच्या प्रतिसादांवरून कळतं. जर पहिल्या लेखातून काही नवे पैलू कुणी मांडले तर त्या विषयावर दुसरा लेख लिहीतो नाही तर तो विषय तिथे संपतो, मग दुसरा विषय!
आता पैसा या लेखावर एकोणतीस प्रतिसाद आहेत पण या विषयावर लिहीण्यापूर्वीच्या चर्चेत मी एक फार महत्वाचा मुद्दा मांडला होता: ‘पैसा हा देणाऱ्याला घेणाऱ्या इतकेच सुख देऊ शकेल अशी काही योजना करता येईल का? ’ यावर चर्चेत एक इतका भन्नाट प्रतिसाद आला की प्रशासकांच्या निदर्शनाला आणून दिल्यावर त्यांनी तो रद्द केला आणि लेखावर प्रतिसाद देतांना कुणीच काही विचारलं नाही, अशा विषयावर मग पुन्हा लेखन होत नाही.
ज्या वेळी मी द्वैतावर लिहीलं तेव्हा ‘प्रेमासाठी तरी द्वैत हवे’ असा अत्यंत सुरेख प्रतिसाद आला होता, मग मी प्रेम हा अतिशय सुंदर लेख लिहीला पण त्यावर एकही प्रतिसाद आला नाही! अशा विषयावर मग मी काय लिहीणार? मग मी दुसरा विषय घेतो. शेवटी मी लिहीतो माझ्या आनंदासाठीच आणि चाहत्यांशी शेअर करण्यासाठी पण प्रक्रिया अशी आहे.
संजय