श्री गणेशाय नमः ॥

श्री गणेशा मीच करावा म्हणतो...

मनो मधुकरो मेघो मद्यपो मत्कुणो मरुत् ।
मा मदो मर्कटो मत्स्यो मकारा दश चञ्चला: ॥

अर्थ:
मन, मधुकर (भुंगा), मेघ (ढग), मद्यपी (दारुडा), मत्कुण (ढेकूण), वारा, मा (लक्ष्मी), मद (गर्व / अहंकार), मर्कट (माकड), आणि मत्स्य (मासा) हे दहा मकार चंचल आहेत.

संदर्भ:
"शिदोरी सार्थ सुभषितांची", डॉ. सरोजा भाटे, प्रथमावृत्ती, ऑगस्ट २००१ (वरदा प्रकाशन, पुणे)