षट्कर्णी भिद्यते मंत्रश्चतुष्कर्णः स्थिरो भवेत् ।
तस्मात्सर्वप्रयत्नेन षट् कर्ण वर्जयेत्सुधीः ॥
अर्थः
गुपित तिघांना कळले तर ते जगजाहीर होते. दोघांत राहिले तर ते गुपित गुपितच राहते. म्हणून शहाण्याने शक्य ते सर्व प्रयत्न करून तिसऱ्या माणसाला (मसलतीतून) वगळावे.
संदर्भः
"सुभाषित-मंजूषा", डॉ. विनायक दुर्गे, प्रथमावृत्ती, ऑगस्ट २००७ (विजय प्रकाशन, नागपूर)
याच अर्थाचे आणखी एक सुभाषित जुन्या पाठ्यक्रमात होते. त्यातील तिसऱ्या चरणाचा मथितार्थ असा होता की एखाद्याच्या मनातली गोष्ट साक्षात ब्रम्हदेवसुद्धा जाणू शकत नाही. ते सुभाषित कोणास माहीत आहे काय?