ध्रुवपदाचे भाषांतर:

नायिका : सुंदर किती ऋतू हा - नि प्रवास छान आहे
नायक : सुंदर असे सहचरी - हे ऋतुलाहि भान आहे ।ध्रु।

पर्याय :

१. यात्राहि छान आहे

२. हे ऋतुलाहि ज्ञान आहे ... किंवा ... ही ऋतुलाहि जाण आहे

इतर सदस्यांची भाषांतरे :

विदेशः

'रमणीय किती निसर्ग - रमणीय किती प्रवास
लावण्य सोबतीला - सृष्टीस भान आहे'

लावण्य सोबतीला हे तर अगदी लाजवाब भाषांतर आहे. धन्यवाद विदेशजी.

प्रशासक, कृपया योग्य ते बदल करावे. आधीच आभार.