आपण वॉरंटी बद्दल  लिहिता, पण या कालावधीतील सेवा अथवा नंतरची सेवा या बाबत भारतात
फार मोठा उजेड आहे. कदाचित अमेरिकन कंपनी योग्य सेवा पुरवीत असेलही, पण त्यांची  सेवा भारतात येताना तिला
भारतीय हवा लागली नाही म्हणजे मिळवलं. विक्रीनंतरच्या सेवेचा दांडगा अनुभव आहे. अर्थातच भारतातला. वस्तू गळ्यात
मारेपर्यंत सेवेबद्दल भरभरून बोलतात. एकदा का तुम्ही पूर्ण पैसे दिले की तुम्ही कोण आणि विक्रेता कोण . मोठ्या कंपन्याही
त्याला अपवाद नाहीत. त्यापेक्षा श्री.  सामंत यांनी  लिहिलेले योग्य आहे. दुर्बिण खरेदीबद्दल जास्त माहित नाही. पण वॉरंटी
आणि सेवा याबद्दल आपणास शंका असल्याने लिहिले आहे.  असो. अशा गोष्टींवर लिखाण व्हायलाच हवं.