कितिक वेळेला वाचन केलं जातं, लिखाण आवडलेलंही असतं पण प्रतिसाद दिला जात नाही. प्रतिसादा वर लिखाण अजिबात अवलंबून नाही असं नाही. प्रतिसाद आला की नक्कीच बरं वाटतं. त्यातल्या त्यात तो टीकात्मक (क्रिटिकल) असेल तर जास्त चांगले. कौतुकाचा प्रतिसाद आला की हुरुप वाटतो हे खरं. असो. आपण सोप्या भाषेत लिहिता म्हणून तर वाचावसं वाटतं.

तुमच्या प्रतिसादाबद्दल पुन्हा धन्यवाद!

माझं लेखन अध्यात्मिक आहे,  (माझ्या कविता आणि कथांची गोष्ट वेगळी), मी माझा व्यक्तिगत अनुभव, ज्यांचं माझ्याशी ट्यूनिंग जमेल त्यांना, उपयोगी व्हावा म्हणून लिहीतो. मी लेखनातून माझा अनुभव शेअर करत असतो.

जेव्हा प्रतिसाद दिला जातो तेव्हा तो त्या विषयाशी अनुरूप आणि लिहीणाऱ्याचा अनुभवातून आलेला असेल तर तो लिखाणाची रंगत आणखी वाढवतो आणि सगळ्यांना उपयोगी होऊ शकतो.  पण निव्वळ शेरेबाजी म्हणून लिहीलेले प्रतिसाद, ज्यांचा विषयाशी काही संबंध नसतो, ते ज्यांना काही तरी फायदा होईल अशी शक्यता होती तिथे संभ्रम निर्माण करतात. मग मला प्रशासकांना त्या लेखनातला व्यक्तीगत रोख निदर्शनाला आणून द्यावा लागतो, परत प्रशासकांना  त्यात तसं काही वाटलं नाही तर अशा प्रतिसादांना उत्तर द्यावं लागतं, मग प्रशासक माझ्या प्रतिसादात काही व्यक्तिगत रोख आहे का ते बघतात आणि मग तो तुमच्या पर्यंत पोहोचतो, इतकी कसरत आहे!

संजय