मी तर गमतीने 'तंदुरुस्ती कि रक्षा करता है वडा पाव, वडा पाव है जहां तंदुरुस्ती है वहां' असे म्हणतो.
कधी मधी सर्दी झाली तर बऱ्याच दिवसांत वडा पाव खाला नाही म्हणुन हि सिस्टीम डिस्ऑर्डर.... असे म्हणून चांगले गरमा गरम दोन वडा पाव खाउन घेतो आणि खरोखरच गुण येतो!!
कुणी "वडा पाव खाणार?" असा सवाल केल्यास "सवाष्ण बाई कधी कुंकवाला 'नाही' म्हणत नाही आणि मी वडा पाव ला!" असे म्हणून वडा पाव चा आनंदाने स्विकार करतो!
वडा पाव आणि बर्गर याची तुलना करण्याचा मोह ज्यांना होतो त्यांनि प्रथम प्रसिद्ध कंपनीच्या बर्गर मध्ये घातल्या जाणाऱ्या 'पॅटी' किती ताज्या आहेत त्याची चौकशी करावी आणि खरा शोध लावावा! [ अकारण उत्सुकते पोटी या नदीचे मुळ मी शोधून काढले होते] माझ्या (पक्क्या आणि खऱ्या) माहिती प्रमाणे आज तुम्ही जो बर्गर खाता त्यातिल 'पॅटी' निदान ६० ते ७० दिवस आधी बनुन, त्यांचा आकार अबाधीत राहावा म्हणून अर्धवट तळून उणे तपमानात (-२० डिग्री सेल्सिअस वगैरे) साठवून ठेवल्या जातात आणि एका ठिकाणी बनलेले हे सगळे पदार्थ तपमान नियंत्रीत गाड्यांमधून वगैरे सर्वदूर पोहोचवले जातात. आपण बर्गर घेतो तेव्हा आपल्या समोर जे तळले जाते ते दुसऱ्यांदा! हे करण्या मागचे कारण म्हणजे कसलीही आपत्ती आली तरी म्हणे यांचे बर्गर निदान दोन महिने तरी मिळत राहतील. [म्हणजे, उदाहरणार्थ मोसमी भाज्या मिळत नाहित, वाहतुकदारांचा संप आहे, सुका वा ओला दुष्काळ आला - वगैरे काहिही होवो - यांचे पदार्थ कुठेही आणि केव्हाही आणि जसे च्या तसे उपलब्ध! तसेच समजा कोलकत्त्याला लाल भोपळी मिरची मिळत नाही वा चेन्नईला अमुक प्रकारची फरसबी मिळत नाही म्हणून तिथे मिळणाऱ्या बर्गर मध्ये तो घटक पदार्थ न घालता बनवता येत नाही - कारण यांचे वैशिष्ट्य काय तर म्हणे कुठेही गेले तरी यांच्या बर्गर ची चव, रंग रुप सगळे काही तंतोतंत जसे च्या तसे मिळते,वगैरे वगैरे.. म्हणून मग त्यासाठी एका ठिकाणीच सगळा माल तयार करणे आले... मग सांगा, तो पदार्थ ताजा असणे शक्य आहे??? ]... म्हणजे, यांचे दुकान सुरळित चालू राहावे म्हणून हे अश्या क्लुप्त्या करतात आणि लोक त्यांचे बर्गर मोठ्या कौतुकाने ताजे - आपल्या समोर तयार केलेले - असे समजून चापतात, छोट्या मुलांच्या वाढदिवसाच्या पार्ट्या तिथे ठेवतात.... असो, विषयांतर झाले, क्षमा करा... मुद्दा हा, कि वडा पाव आणि बर्गर चि तुलना नको.
भजी म्हणाल तर अनेक प्रकारची असतात - आणि हिंदीत त्याला पकोडा म्हणतात असे माझे मत आहे. जरा चौकशी केली पाहिजे!
चीझ तर काय चीज आहे राव! बऱ्याच पदार्थांना छान रुप आणि छान चव येते चीझ घातल्यावर! उदा. - सॅंड्वीच, दाबेली, पाव भाजी, मसाला पाव, टोमेटो सार, वगैरे... यादी लांबेल... तसेच चीझ पकोडा.... ह्म्म्म.... झकास!