माझेही मत प्रवासीं सारखेच आहे.
===
कविता
मूळ बातमीत कवितांबद्दल पण प्रश्न उपस्थित केला आहे.
कवितांची गोडी शिक्षकांनी शिकवल्याशिवाय कशी कळणार, आणि कळाली नाही तर गोडी कशी लागणार. आमचे गमाकु (ग मा कुलकर्णी) फार छान कविता शिकवायचे. पण दुर्दैवाने ते फक्त एकच वर्ष आम्हाला मराठी शिकवायला होते.
पण अभ्यासक्रमातल्या कवितांमध्येच जर का गोडी नसेल तर शिकवणार तरी कशी. आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येईल. सध्याच्या अभ्यासक्रमाबद्दल माहित नाही, पण आमच्या वेळेस काही कविता अतिशय रटाळ होत्या. माणसाला झोपवण्यासाठी किंवा झोपलेल्याला उठवण्यासाठीच (अमोनिया प्रमाणे) त्यांचा उपयोग असावा.
मला असे वाटायचे/वाटते की 'जगात रटाळ कविता पण असतात' हे शिकवण्यासाठीच त्या कविता अभ्यासक्रमात असाव्यात. आणि अश्या कविता लिहिणारे कवी इतके प्रसिद्ध कसे होतात असे वाटायचे. "यांच्या कवितांपासून सावध राहा" हे कळण्यासाठी होत असावेत असे वाटायचे.
एस् एस् सी ला बोर्डाची तोंडी परीक्षा नसायची हे बरे आहे. नाहीतर या असल्या रटाळ आणि मुक्तछंदातल्या कवितांना कसली चाल लावणार, कश्या पाठ करणार आणि कोणत्या लयीत म्हणून दाखवणार?!