पराग साहेब लिहितात ते बरोबरच आहे. शेतीमालाला योग्य किंमत मिळाली नाही तर नुकसान सोसून वाहतुक करून बाजारात पाठवणे मुर्खपणाचे ठरते अशी अनेक उदाहरणे मला पण माहित आहेत.

या साठी दुग्ध उत्पादक संघ असतात तसे भाज्या, फळे वगरे साठी देखिल संघ स्थापन करायला हवेत. शेतकऱ्यांच्या संभाव्य नुकसानाची चाहुल घेणारी यंत्रणा उभारायला हवी.

कधी कधी एखाद्या पिकाला शहरात (किंवा नजीकच्या बाजारपेठेत) चांगला भाव मिळतो असे वाटले तर मागचा पुढचा विचार न करता आसपासच्या चार सहा गावांतील सगळे शेतकरी आंधळेपणाने त्याच एका पिकाच्या मागे हात धुवून लागतात. एकदा असेच माझ्या माहितीतल्या एका गावतले आणि आजुबाजुच्या गावातले पण असे बरेच शेतकरी 'लाल भोपळी मिरची' या पिकाच्या मागे लागले. कारण तेव्हा लाल भोपळी मिरची शहरांत अचानक लोकप्रिय होउ लागली होती आणि त्याला किरकोळ भाव शंभर रुपये प्रती किलो मिळत होता. ते पाहून एकाने भरपुर नफा मिळवण्याच्या आशेने आपल्या जमिनीचा मोठा भाग (जवळ जवळ १ एकर) त्या पिकात गुंतवला. त्याचे बघून ईतरांनीही तेच पिक घेतले. तोडणीच्या वेळेस सगळ्यांचे मिळून इतके प्रचन्ड पिक आले (त्याला बंपर क्रॉप आले म्हणतात) आणि मागणी तशी मर्यादीतच होती म्हणून अर्थातच भाव कमी मिळण्याची चिन्हे दिसायला लागली. मग सगळ्यांचा भ्रमनिरास करणारे संकट ओढवले.. मोठ्या शेतकऱ्यांनी तो माल व्यापाऱ्याला विकून त्याचे मिळतील तेव्हढे पैसे तरी घेतले कारण त्यांची नुकसान सहन करण्याची ताकद होती. पण लहान सहान शेतकरी अक्षरशः रडकुंडीला आले, माल पडून राहिला तर सडेल, वास येईल, म्हणून चक्क फेकून दिला. उरली सुरली तोडणी करण्यात आणखी मुर्खपणा पदरात यायचा म्हणून सरळ शेत नांगरून टाकले! त्या गोष्टीला आता १२ वर्षे झाली... त्या लोकांनि परत त्या पिकाचे नाव घेतले नाही!

तो सर्व प्रकार मी जवळून पाहिले होते.. त्यातील बड्या शेतकऱ्यांच्या चर्चेत हा विषय आला कि शेतकऱ्यांच्या भल्यासाठी समन्वय साधणाऱ्या संस्था हव्यात. कुणी काय पिक घ्यावे, किती जमिनीत घ्यावे.... वगैरे केवळ एका पिकावर आधारीत शेती करू नये... वगैरे  माल फुकट जाउ नये म्हणून मालावर प्रक्रिया करण्यासाठी छोटे कारखाने उभारायला हवेत वगैरे... पुढे त्या सगळ्याचे काय झाले कुणास ठाउक...एकी असली तर यातील बऱ्याच गोष्टी शक्य आहेत.

सबब, वरील बातमीत टॉमेटोचे जे झाले, ते पाहता टोमेटोवर प्रक्रिया करून टोमेटोचा गर, केचप, सॉस वगैरे तयार करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. आपण शहरांत राहून फार काही करू शकत नसलो तरी कधी मधी कुठे सहलीला गेल्यावर शेती माल विकण्यासाठी आहे का असे विचारून किरकोळ बाजारात शहरात जो भाव देतात तो देउन माल घेण्याचा वसा घ्यावा. पिकवणारे हात जेव्हा विकणारे हात असतात तेव्हा आपण त्यांच्या हातात थोडे पैसे जास्त दिले तर त्यांच्या कष्टांचे फळ त्यांना मिळेल, आपल्याला समाधान मिळेल.