त्याला अद्ल घडली, म्हणजे त्याला कोर्टात खेचला आणि कोर्टाने त्याला शिक्षा दिली म्हणजे त्याला अद्दल घडली. अशा अर्थाने अद्ल चे अद्दल झाले असावे.

मुसलमानी अमलातले कित्येक शब्द मराठीत कडवट आणि हिणकस अर्थानेच वापरले जातात (उदा. फतवा, मोंगलाई इ.)हे आपण पाहिलेच असेल. त्यामुळे अद्ल (न्यायनिवाडा) म्हणजे अद्दलच!