छायाताई : ह्या अवघड कामगिरीला पार पाडण्यात त्यांच्या आईने त्यांना सतत प्रोत्साहन दिले. ... या वाक्यावर जरा हिंदीचा प्रभाव जाणवला. 'ही अवघड कामगिरी पार पाडण्यात.. ' असेच सहसा मराठीत लिहिले-बोलले जाते.
अजयराव : त्या वाक्यावर हिंदीचा प्रभाव नाही;
टायपो आहे.
हा टायपो (टायपिंगची चूक) नसावी असे मला वाटते. टंकलेखनाची चूक अनवधानाने होत असते. म्हणजे लिहिणाऱ्याला जे लिहायचे असते त्याऐवजी एखादे अक्षर वेगळे लिहिले जाते.
वरील वाक्यात "ही अवघड कामगिरी " ऐवजी "ह्या अवघड कामगिरीला" असे दोन निरनिराळ्या ठिकाणी एकामेकाला सयुक्तिक असणारे बदल टंकलेखनाच्या चुकीतून झालेले असतील असे वाटत नाही. मराठीत नव्या नव्या शब्दांची, नव्या नव्या रचनांची भर घालून तिचे दारिद्र्य दूर करावे, ह्या हेतूने म्हणा किंवा इतर चारचौघांपेक्षा वेगळे शब्द / रचना वापरून अशा महत्त्वाच्या विषयावरील आपले लेखन इतर चारचौघांहून विशेष व्हावे म्हणून म्हणा आपण हे प्रयत्नपूर्वक विचारपूर्वक केलेले वाटते.
कमांडर दोंद्यांच्या योजनाबद्ध / विचारपूर्वक / आखणीबद्ध (आधी एकदोन वेळा काळजीपूर्वक तपासून पाहिलेल्या) पराक्रमाबद्दल मराठी लोकांना सांगताना पराक्रमाच्या आदर्शाबरोबरच लेखनाचाही एक चांगला आदर्श निर्माण करावा असेच आपल्या मनात असावे असे वाटून गेले.
पु. ले. शु.