ज्या गोष्टींसाठी साऱ्यांना तयार करावं लागेल आणि एखादी अत्यंत विकसित मान्यता नाहिशी करावी लागेल तो पर्याय सद्य क्षणात शक्य होणार नाही, म्हणजे अर्थव्यवस्था नष्ट करणं व्यवहार्य होणार नाही.

मुळात पैसा ही अत्यंत सोयीची आणि हितकारक कल्पना आता नष्ट करणं शक्य नाही. ते वेळ ही कल्पना नष्ट करण्या इतकं दुरापास्त आहे.

सगळ्यात सोयीचं आणि आता करता येईल असं एकच काम आहे ते म्हणजे आपला पैशाकडे बघायचा दृष्टीकोन बदला. तुम्ही आहे तो पैसा आणि समोरचा प्रसंग अत्यंत वस्तुनिष्ठपणे बघा. समजा आता तुम्हाला आईस्क्रिम हवं आहे, तुमचं आवडतं आइस्क्रिम आणि तुमच्या पाकिटात असलेले पैसे यांचा मेळ बसतो आहे, आता विचार करू नका, आइस्क्रिम घ्या, तुम्हाला शक्य असेल तर फॅमिली पॅक घ्या, घरी न्या आणि सगळ्यांनी मजा घ्या, आता त्या पैशात इतर कायकाय येऊ शकेल असा विचार करू नका. यानी तुमचं पैसा खर्च करण्याचं धाडस वाढेल, पैसा साठवणं, सहज शक्य असतांना उगीच भावनात्मक विचार करणं तुम्हाला आर्थिक निर्णय घेऊ देत नाही. वर्तमानात जगा, पैशापेक्षा आनंद महत्त्वाचा आहे, पैसा निर्णयाचा केंद्रबिंदू ठेवू नका, तुम्ही केंद्रबिंदू व्हा मग तुम्हाला पैसा वापरता येईल, पैसा तुम्हाला वापरणार नाही, ही मेख आहे.

तुम्ही माझे फॅन आहात हे वाचून आनंद झाला, आता मी म्हणतो तसं जगून बघा आणि कळवा.

संजय