शिरीषांचें तें दूर दूर राहाणें आवडलें. स्वानंदासाठीं साहित्यनिर्मिती करणारे तसे विरळाच. टॅक्सीतली कविता तर नितांतसुंदर. ती सुंदर तरुणी डोळ्यांसमोर उभी राहिली.
लंगित दिवे आणि चंदलाचें लग्न छानच आहेत. इतक्या लहान वयांत कविता सुचणें केवळ विस्मयजनक आहे. सृष्टीचमत्कार एवढेंच म्हणतां येतें.
मालिकेंत विविधता आल्यामुळें उत्कंठा कायम राहिली आहे.
धन्यवाद आणि शुभेच्छा.
जातां जातां आठवलें, कवी लेंभे नाट्यछटाकार दिवाकर यांचे आवडते कवी होते. केशवसुत, अनिल, कुसुमाग्रज, वर्डस्वर्थ, ब्राउनिंग इ. कवींबरोबरच ते लेंभे यांच्याही कविता वाचीत. आपल्या लेखमालेमुळें मला लेंभे कोण हें ठाऊक झालें होतें. धन्यवाद.
सुधीर कांदळकर