मीं वाचली होती. भरपूर कुतूहल होतें पण फारशी माहिती मिळाली नाहीं. बहुधा आय पी एल मुळें असेल. पण लेख आवडला. अनुदिनीच्या दुव्याबद्दल धन्यवाद द्यावेत तितके थोडेच.
गंमत म्हणजे आपण अशी सागर परिक्रमा करूंया असें मीं गेल्या वर्षीं सेवानिवृत्त झाल्यावर आमच्या मित्रमंडळांत म्हटलें होतें. मोटारीनें फिरतों तसें समुद्रांतून फिरायचें. पण एकाहीकडून अनुकूल प्रतिसाद आला नाहीं. वर माझी भरपूर टवाळीही झाली. तशी नेव्हिगेशन, समुद्राची ओळख असणें आणि इतर कांहीं कौशल्यें अवगत असल्याशिवाय जमणारी ही गोष्ट नाहीं. शिवाय अनुभव आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांचें ज्ञान अशा क्लिष्ट बाबी आहेतच. पण कांहीं तज्ञ हौशी प्रवासी गोळा करतां येतात. फक्त इच्छाशक्ती हवी. असो.
परिक्रमा शब्द ठीक वाटला. परिमिती आणि मार्गक्रमणा यांवरून हा शब्द बनवला असावा. पण कांहीं असो, अर्थ कळल्याशीं कारण. पुन्हां एकदां लेखाबद्दल धन्यवाद.
सुधीर कांदळकर