इंग्रजीतल्या यू, युवर इ. चे मराठीत भाषांतर करताना ते तुम्ही तुमचा असे सर्रासपणे न करता आपण (स्वतः ह्या अर्थी) आपले  असे करावे असे मला वाटते.

उदा.
अनुभव म्हणजे तुमच्यासोबत जे घडले ते नव्हे, तर जे घडले त्यावर तुम्ही जे केले तो अनुभव!
ऐवजी
अनुभव म्हणजे आपल्यासोबत जे घडले ते नव्हे, तर जे घडले त्यावर आपण जे केले तो अनुभव!

किंवा

लोक तुमचा "सल्ला" मानत कधीच नाहीत. ते तुमचे "उदाहरण" घेतात.
ऐवजी
लोक आपला 'सल्ला' मानत नाहीत. ते आपले 'उदाहरण' घेतात.

हे कानाला जास्त बरे वाटेल असे वाटते.