नीलहंस,
छान जमलंय.
अश्रू सजले पुन्हा नव्याने
दुःख उमजले पुन्हा नव्याने
या ओळी मला नेमका अर्थ सांगत नाहीत. अर्थ समजावून घ्यावा लागतोय. म्हणून कदाचित थोड्या कच्या वाटतात.
महाल खचले स्वप्नांचे का?
चढवा मजले पुन्हा नव्याने
वा वा. हा संबोध सुंदर मांडलाय. आशावादाचे उदाहरण आहे. पुन्हा नव्याने नेमके बसलेय ईथे.
रुजता इवल्या बीजांमधुनी
वृक्ष निपजले पुन्हा नव्याने
येथे बिजातून वृक्ष पहिल्यांदाच येतो असे वाटते. पुन्हा नव्याने नीट जमत नाही असे वाटते. त्यामुळे हा शेर कच्चा वाटतो.
कधी सोयरे, कधी सोय रे
अर्थ समजले पुन्हा नव्याने
शब्दांचा खेळ छान जमलाय. शेर देखील छान अर्थरूप झालाय.
लढा स्वतःशी शब्दांनो! मी
मौन परजले पुन्हा नव्याने
परजले हे शस्त्र परजणे यातलेच क्रियापद असावे. नसल्यास खुलासा करावा. नक्की अर्थबोध होत नाहिये मला. त्यामुळे या दोन ओळींची मजा घेता नाही आली.
तुम्ही छान लिहिता. गेय लिहिता. संवेदनाशिलतेने लिहिता. जगण्याचा अर्थ खोलवर समजल्याप्रमाणे लिहिता. मला तुमचे लिखाण आवडले.
सौमित्र