महाल खचले स्वप्नांचे का?
चढवा मजले पुन्हा नव्याने
मस्त शेर आहे. केवळ आशावाद नाही. यात टिंगलेचाही सूर आहे. अजून नव्याने मजले चढव. तुझा स्वप्नांचा महाल तर खचणारच होता.
लढा स्वतःशी शब्दांनो! मी
मौन परजले पुन्हा नव्याने
शब्दांनो, इथे तुमचे काही काम नाही. लढा स्वतःशी आहे आणि मी मौन परजले आहे.
किंवा शब्दांनो तुम्ही लढत बसा. तुमच्या भांडणात काही अर्थ नाही. जवळ येऊ नका, मी मौन परजले आहे.
वा.
चित्तरंजन