मागे एका प्रतिसादात शीतलनी म्हटलं होतं की 'आमच्या मनात जे आहे ते तुम्ही लिहितायं असं वाटतं'. मी खरंच सगळं कसं सोपं होईल आणि करता येईल एवढंच बघतो. माझ्या मते निसर्गाची बुद्धीमत्ता एकदम सोपी आणि साधी आहे. दि युनिव्हर्सल इंटेलिजन्स इज जस्ट अ सिंप्लिसिटी. जिथे प्रयास आहे तिथे काही तरी चुकतंय एवढ एक जरी सूत्र तुम्ही वापरलं तर सगळं जमून जाईल.
परीमी, तुम्ही इतरांशी वाद-विवाद इतक्यात करू नका, लोकांना सूत्र वापरून बघण्यापेक्षा हुज्जत घालण्यातच जास्त रस असतो त्यामुळे तुमचा वेळ जाईल आणि त्रास होईल. तुम्हाला उपयोगी होईल असा एक मुद्दा सांगतोः
मी जेव्हा आर्टीकलशिप करत होतो तेव्हा आम्हाला सांगीतलं होतं की 'कॅश कॅनॉट हॅव अ नेगटिव्ह बॅलन्स' (रोख रक्कम कधी ही ऋण असू शकत नाही). थोडक्यात तुम्ही जेवढा पैसा आहे त्या पेक्षा जास्त खर्चच करू शकत नाही त्यामुळे तुम्ही योग्य वाटेल आणि आवश्यक असेल तो खर्च बिनधास्त करा; आणि काहीही झालं तरी लोन घेऊ नका (घराचा अपवाद सोडून), तुम्हाला पैसा कधीही कमी पडणार नाही.
संजय