श्री. फणसे सहेब, दिक्षित साहेब आणि जोशी साहेब,
आपल्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद. अशा आशीर्वादामुळे आणखी लिहिण्यास प्रोत्साहन मिळते. आता जरा फणसे साहेबांनी उपस्थित केलेल्या मुद्या बद्दलः
१) मराठी भषेवर अक्रमण ही एक विचारधारा आहे. दुसरी अशी की दुसऱ्या भाषेतील शब्द घेतल्याशिवाय कोणतीही भाषा समृद्ध होत नाही. इंग्रजीने जगातील सर्व भषेतील शब्द उचलले आहेत. अगदी मराठी पण! गजल हा प्रकारच मुळी मराठी नाही. "गजल" या शब्दाला मराठीत प्रतिशब्द नाही.बहत्या या शब्दा ऐवजी वाहत्या हा शब्द वापराता आला असता, पण मात्रात पडलेला फरक गजलेत चालत नाही. कवितेत चलू शकतो. माज्या गजलेत कफिया (उपांत्य यमक) वाल्या, प्याल्या आल्या असे आहे. म्हणून छ्याल्यावरती चा प्रयोग करावा लागला. छ्याल्याला आम्ही मरठवाड्यात घट्टे असे म्हणतो. तो शब्द येथे जमला नसता. शिवाय माझी अशी धारणा आहे की एखादा उर्दू शब्द मजबूरीने वापरल्यास गजेलेच्या रुपात भरच पडते.न्याय जगीचा लिहिताना मला "जगातला" असे म्हणावयाचे होते. जगाचा पण चालला असता.
मी सध्या ज्या गजलेवर काम करत आहे त्यात चार पाच उर्दू शब्द आले आहेत. शब्द जरा अवघड असल्यामुळे त्यांचा अर्थ पण टीपेच्या स्वरुपात देण्याचा विचार करतोय. प्रयत्न हा असतो की भाषेच्या बंधनामुळे एखादा शेर लिहिण्याची उर्मी दबली जाऊ नये.
वरील सर्व लिहिताना मी फार विचार करून लिहितो असे नाही. जे सुचते ते आणि जसा मूड (पुन्हा मूड ! ) असेल तसे लिखाण होते. ती एक अनिभुती असते.
प्रदीर्घ खुलास्या बद्दल क्षमस्व.