केले आहेत तुम्ही तुमचे विचार. आपला समाज कुठे निघाला आहे आणि त्याबरोबर आपण वाहत जायचे का, नाही तर काय हे खरेचच काळजीपूर्वक विचार करण्यासारखे मुद्दे आहेत. खरोखरच काही कालावधीने असा काही पर्याय स्विकारावा लागेल.
वैयक्तिक पातळीवर थोडेसे आमचे तसे होताना दिसते आहे. तसं अगदी छोटंसं पण बाहेर जे सुरू आहे त्याच्याशी सुसंगत उदाहरण. आमच्या शेजाऱ्याला आमच्याशी भांडायला आवडते. पार्किंग, देखभालखर्च, आवराची निगराणी अशा अनेक विषयात हात पाय तोडतो, बघून घेतो, आई-बहिणी हे मुद्दे संपले की शेवटी तो आमच्या भटुर्डेपणावर घसरतो. हा उद्धार अनंतवेळा झालेला आहे पण आम्ही शांततेच्या भाषेतच अजूनही आहोत. नवरा म्हणतो त्या माणसाला हा एकच उद्योग आहे, आपलं तसं आहे का? उलट आम्ही घर बदलण्याच्या पर्यायावर आलो आहोत. माझ्या मते हा पळपुटेपणा आहे, प्रतिकार करायलाच हवा, कुणीही उठावं आणि आपला उद्धार करावा इतके आपण स्वस्त आहोत का, आम्ही त्याला तोडीस तोड उत्तर देऊ शकतो पण नवऱ्याच्या मते कोणत्या गोष्टीवर आपली ऊर्जा खर्च करायची, वेळ वाया घालवायचा ते आपणच ठरवायला हवं. आणि या मुद्द्यावर सर्व कुटुंबिय एकीकडे आणि मी एकीकडे अशी परिस्थिती आहे. त्याच्या मते हा माणूस पूर्ण दुर्लक्ष करण्याजोगा आहे. मीही त्याचे हातपाय तोडू शकतो, शिवीगाळ करू शकतो, पण मी हे केलं तर तो पुढे आणखी वाकड्यात जाईल, मग पुन्हा आपण काही, याला अंत नाही. कारण त्या माणसाला कुठे थांबावं हे तारतम्य नाही, जे आपल्याला आहे. पोलिसांकडे आम्ही जीवाला धोका म्हणून तक्रारी दाखल केल्या आहेत, पण त्यांनाही नवऱ्याने आम्ही सांगत नाही तोवर कोणतीही कारवाई करू नका असे सांगितले आहे. कारवाई कराल तेव्हाही त्याची बायको अशिक्षीत आहे आणि त्याला दोन अजाण मुली आहेत हे लक्षात ठेवायला त्यांना सांगायला तो विसरला नाही. असा माणूस प्रथमच भेटला असावा त्यांना.
कशाच्या जोरावर तो ही माजोरी करतो याचा आपल्याला अंदाज नाही, तो काढत बसण्यात स्वारस्य आणि वेळ त्याहून नाही आणि तो माणूस तितका महत्त्वाचाही नाही, मी बऱ्याचदा परगावी जात असतो, तेव्हा माझ्या बायकामुलांची आणि स्वतःची चिंता करत बसावी लागावी अशी परिस्थिती आपल्याला निर्माण करायची नाही असे माझ्या नवऱ्याचे यावरचे विचार आहेत जे मला पटतात. शिवाय इमारतीतल्या इतर कोणाही शेजाऱ्यांना (भटुर्ड्या! ) याचे सोयर सुतक नसणे हाही एक कंगोरा ह्या प्रश्नाला आहे.
एकूणात हे सगळे तारतम्याचे विचार करण्याचा मक्ता मात्र ब्राह्मणांनीच घेतला आहे असे दिसते. तुमच्या लिखाणावरूनही असा निष्कर्ष काढता येईल. विधायक काही करण्यासारखे सुचत नसेल तर असे काही केले जात असावे का?