तसेही जातींचे राजकारण सुरू होण्याअगोदर हुशार, बुद्धिमान मुले परदेशात नशीब कमवायला जातच होती. आताही जात आहेत. मात्र आता अगदी परदेशातल्या सर्व सुविधा मिळाल्या नाहीत तरी तसा पैसा मिळवण्याची संधी आपल्या देशात राहून, आप्तस्वकियांसमवेत राहून मिळवता येते. खासगी/ कॉर्पोरेट क्षेत्रात तरी अद्याप जातीचे राजकारण घुसलेले नाही. त्यामुळे तिथे बुद्धिजीवींना वाव आहे. ज्या दिवशी ते क्षेत्रही राखीव होईल त्या दिवशी मात्र पोटापाण्यासाठी परदेशाचा पर्याय निवडण्यावाचून गत्यंतर उरणार नाही.
आणि समाजात कोठेही जा, एक कंपू दुसऱ्या कंपूच्या विरोधात उठलेला दिसेल. परदेशात रेसिझम, वर्णद्वेषाचे कटू अनुभव येणारेही लोक कमी नाहीत. सेकंडरी सिटिझनशिप, भेदभाव, कंपूबाजी ही तिथेही सहन करावी लागतेच.... फक्त त्याचे स्वरूप वेगळे असते. इथे आज ब्राह्मण - मराठा - बहुजन असे कंपू दिसतील, तर उद्या हिंदू - मुस्लिम- ख्रिश्चन असे दिसतील, तर परवा मराठी - बिहारी - गुजराती असे कंपू दिसतील.... कोण कोणावर वरचढ होतो, कोणाला खाली खेचतो, कोणावर राज्य गाजवतो, कोणाला नेस्तनाबूत करतो ह्याचा पॉवर गेम आहे हा!
त्याला फशी पडायचे की नाही, त्यात गुंतायचे की नाही, त्याला ओलांडून सर्वसमावेशक मार्ग चोखाळायचा की नाही हे सर्वस्वी आपल्या हातात!