प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद!
संजयजी,
ही उद्विग्नता नाहीच मुळी. युक्ती, बुद्धी, कर्तृत्व या जोरावर ब्राह्मण आपला विकास करून घेण्यास समर्थ आहेतच. पण सुरक्षिततेसाठी त्यांना खरोखरच देशाबाहेर पडावे लागल्यास तो देश, समाज, सभ्यता यांचा पराभव नसेल का?

सईजी,
विधायक करण्यासारखे सुचत नाही, ही वस्तुस्थिती नसावी. आपल्या यजमानांच्याच तर्कानुसार कोणत्याही कृतीचा विधायक परिणाम होणार नसल्याची जाणीव ब्राह्मणांना गप्प बसण्यास भाग पाडत असावी.

सविताजी,
आभार!!!

श्री. गंगाधरसुत,
आपणाला ही माहिती ठाउक असेल, याची खात्री आहे. तरीही सर्व वाचकांसाठी मुद्दाम नोंद करावीशी वाटते.
पुराणकाळात असलेल्या चार वर्णांपैकी 'बामण' हा एक. हे चार वर्ण त्यांच्या त्यांच्या क्षमतांनुसार निश्चित केले गेले होते. त्यामुळे वर्ण बदलण्याची मुभा प्रत्येकाकडेच होती. बामणांना कोणत्याही वर्णाची कामे करण्याची सूट होती; तर वैश्यांना दोनच. त्याकाळातले बामण शेती करत असल्याच्या अथवा यज्ञात समर्पित केलेल्या प्राण्यांचं भक्षण करत असल्याच्या नोंदी आढळतात.
जुन्या काळातले क्षत्रिय ज्ञानार्जन करून ब्राह्मण झाल्याचे दाखले उपलब्ध आहेत.
अथवा, पेशव्यांनीही शस्त्रे उचलल्याची कारणे आणखी कोणती असावीत?
याचा अर्थ ब्राह्मण (जुने बामण) हे कायमच काळानुरूप बदलत आलेले आहेत. आणि त्यामुळेच त्यांचा टिकाव शक्य झाला. याच कारणाने गंगाधरसुत यांचे विचार योग्य आणि सयुक्तिक वाटतात.