अरुंधतीजी...
तुमचं म्हणणं सत्यवाचक आहे. पण परक्या देशात सोसावा लागणारा भेदभाव हा समजून घेतला जाउ शकतो. पण तुमच्याच देशात?

संजयजी,
माझ्या मते, तुमचा प्रतिसाद हा उपाययोजना नव्हे; तर वस्तुस्थितीच प्रकट करतो. सध्या अगदी तसेच वागले जाते.

खुलासा म्हणून करतो...
मी स्वतः सहिष्णू आहे (सांगावे लागते, हे तसे दुर्दैवच! ). हा लेख लिहिताना मी स्वतःलाच रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु तसे करणे अयोग्य वाटले. त्यातून मी इतर जातींवर ताशेरे ओढलेलेच नाहीत. त्यामुळे, एका जातीच्या बाजुने बोललं, म्हणून हा लेख जातीयवादी ठरू नये. मी 'उच्चवर्णीय' अथवा तत्सम विशेषणे वापरली असती, तरी संदर्भ आत्ताचाच निघाला असता; उलट आडवाटेने बोललेली गोष्ट अधिक झोंबली असती.

असो...
जातीयवादाचा उहापोह, विकृत मनःस्थितीचा परिणाम, चिथावणीपूर्ण हेतू असले काहीही या लेखातून टिपले जाऊ नये. फक्त एक दृष्टिकोण म्हणून याकडे पाहिले जावे. आणि त्यातून मी गैर असीनच, तर त्याची योग्य जाणीव करून देण्याइतकी प्रतिभा मनोगतींमध्ये आणि 'मनोगत'च्या प्रशासकांकडे आहेच!

आपला नम,
शेखर