आमच्या भागातील एका राजकीय नेत्याचे एक वाक्य आहे " हा दोन टक्के समाज फार विचित्र आहे. हा कसा आहे? तर हा रबरी चेंडु सारखा आहे,
जो जेवढ्या जोराने दाबाल तेवढ्याच काय पण त्या पेक्षा दुप्पट गतीने उचंबळून वर येतो, तेंव्हा व्यथेत व्यर्थ विहरण्यात साधणार काय? .
आणि एक आपण आपला दृष्टिकोन समाजाभिमुख ठेवला आहे ना?... आपण आपल्या विचारांशी ठाम आहोत ना?..
मग जगाची पर्वा कश्याला करायची . आपली सिद्धता दाखवायची ती एकमेकाच्या हातात हात घालून जसे आपण आपल्या देशाच्या ईतर नागरीकांकडून अपेक्षा करतो की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ तर मग तेच आचरणात आणायचे . व्यथा काळजात जपायची अगदी तीच
पुस्तकातील पिंपळपान होऊन जाळी होईपर्यंत पण मुखाद्वारे बोलून काय साध्य होणार तेंचा ..... चरित्र अभ्यासून चरित्र जपावे असे मला वाटते
कारण आपण जातीभिमुख विचार करणारे तर कधीच नव्हतो समाजासाठी आपण घरादाराची राख रांगोळी करणाते आहोत कोणत्याही अभिलाषेशिवाय राष्ट्रचिंतन महत्त्वाचे तेच बदल घडवतील