असं नाही!
...उलट आम्ही घर बदलण्याच्या पर्यायावर आलो आहोत...
असं करू नका. आपण बरोबर असतांना भीती कसली?
तुम्हाला एक मजा सांगतो
माझ्या शेजाऱ्याचा आणि त्याच्या पत्नीचा त्यांच्या घरात अगदी दर्शनी भागात खुद्द राष्ट्रपतीं बरोबर काढलेला फोटो लावलेला आहे. आमच्या चेअरमनची एक पुरातन पडीक वेस्पा आहे. 'तुमची जुनी स्कूटर मला फार आवडते' (म्हणजे पुढे मागे मी ती नोकरांसाठी घेईन) असं आमिष दाखवून त्यांनी चेअरमनला स्वतःकडे सामिल करून घेतलं आणि बिनदिक्कतपणे प्लॅटमध्ये अवैध बांधकामाला सुरुवात केली!
मला तर माझ्या घरातूनच विरोध होता (हे खरं तर वेगळं लिहायला नको) 'आपल्याला काय करायचंय, बाकीच्यांना काही सोयरसुतक नाही तर तुम्ही कशाला पुढाकार घेतायं.. वगैरे'. पण आम्ही ते सर्व काम पूर्ण वैधमार्ग वापरून थांबलंच, आता बोला! आणि शेजारी आणि मी एका बैठकीतले (ही त्याहून मजा)!
तर सांगायच काय, तुम्ही एकदाच तुमच्या शेजाऱ्याला समज द्या की तुम्ही पोलीस कंप्लेंट करणार आहात आणि त्यानी नाही ऐकलं तर बिनधास्त, रितसर, उभयता जाऊन कंप्लेंट करा, कायदा आणि सुव्यवस्था हेच तर पोलीसांचं काम आहे. तुमचे सगळे प्रश्न एका झटक्यात सुटतील. तुम्हाला हवा तर माझा आय. डी. घ्या. दुवा क्र. १
मला वाटतं तारतम्य आणि भीती यात आपण गल्लत करतो.
संजय