एकूण चर्चा वाचली  आणि लिहावेसे वाटले. मध्येच लिहिल्याबद्दल ,श्री क्षीरसागर साहेव् आणि  धूपकर साहेब यांची मी क्षमा मागतो.   आपल्याला जर देश सोडायचा नसेल तर सर्व प्रथम धर्म , जात , पंथ, बाबा, बापू, इत्यादींना चार
भिंतींच्या आत कोंडावे लागेल. त्याना घराबाहेत काढलं की सगळे प्रश्न सुरू झाले. मी तर थोडा पुढे जाऊन असंही म्हणेन, की सामुहिक
उपासना चक्क बंद कराव्यात. देवळांवर बहिष्कार टाकावेत. म्हणजे देऊळ किंवा तीर्थस्थान हे उत्पन्नाचे साधन आहे ही कल्पना प्रथम मोडित
निघेल. नाहितरी , पुजारी बहुतेक ठिकाणी ब्राह्मणच असतात. त्यांना काही प्रश्न यायला नकोत (काही झालं तरी ते बदलतीलच. ). आपण
कोणत्याची देवळाच्या लांबलचक (म्हणजे काही तास चालणाऱ्या रांगा) रांगेत उभे राहून दर्शन घेऊन पाहा . बाहेर आल्यावर आपला चेहेरा
पाहण्यासारखा असतो( कारण आपण भक्तिभावाने गेलेले असता आणि आतली दर्शनाची तऱ्हा वेगळी असते) . माझ्या मते तिथे एक पाटी लावावी.
"येशील परत दर्शनाला ? "  (उदा. टिटवाळा गणपती, शिर्डी वगैरे) . आता इथे प्रश्न असा आहे की , हरणाऱ्या जुगाऱ्यासारखी जर आपण आपली
अवस्था करून घेतली असेल तर मात्र देवानीच लाथ मारल्यावर काय व्हायचं ते होईल. लोकांनी स्वतःच हे निर्णय घेऊन त्याप्रमाणे वागण्यात बदल
करावा म्हणजे राजकारणी लोकांच्या "कलाकारीला " बळी पडण्याचे बंद होईल. बहुतेक थोडा तरी फरक पडेल. त्याचप्रमाणे  नको तिथे अध्यात्म
लावणं हेही बंद होईल. आपण संसारी म्हणून जन्माला आलो, संत म्हणू न  नाही  (पण आदर्शांची पुजा करताना माणसं  तसं बनण्याचा प्रयत्न करतात)म्हणजे पैशाचं महत्त्व कळेल. आयुष्य म्हणजे जुगार नाही, ते नीटच जगावे लागते. हेही कळायला हवं . या बाबतचं समाज प्रबोधन ( मीही सवयीने जड शब्द वापरला) हे वागणुकीतून व्हायला हवं.
                                                    नुसत्या वांझोट्या चर्चा , महाचर्चा करून दैनंदिन प्रश्न  सुटण्यासारखे नाहीत. उपासना , दैवी कृपा हे वैयक्तिक ठेवायला हवं. कामाचं महत्त्व ठेवायला हवं. मी काम कमी करून कामावर कशी मजा करतो किंवा मी कसा माझ्या बॉसला पॉकेट केलाय ह्या गोष्टी वंद व्हायला हव्यात. आपण वागणूक बदलल्याशिवाय समोरची परिस्थिती बदलणार नाही हे लक्षात घ्यायलाच हवं. आज ,
घरातून बाहेर पडल्यावर ज्या कामाला  (अर्थातच वैयक्तिक , कार्यालयीन काम अपवाद)  चाललोय, ते काम होणार कां ? हा प्रश्न असतो. बाहेर  पडल्या पडल्या बस, रिक्षा, टॅक्सी हे मिळण्याचे प्रश्न असतात. ते सोडवायचे बाजूला ठेऊन सतसंगाचं , उपासनेचं महत्त्व सांगितलं जातं, हा केविलवाणा विनोद आहे. आणि काही साधलं नाही की जात , धर्म, अल्पसंख्याकता, ही सोपी कारणं असत्तातच पुढे करायला. राखीव जागांबद्दल  तर बोलायलाच नको, "भगवान बचाय इन चीजोंसे" असं म्हणायची वेळ येते (मुद्दाम हिंदी  वापरले आहे) . ब्राह्मणच कशाला कोणालाही  देश सोडून जावसं वाटण्याची शक्यता भविष्यात निर्माण होईल. लिहिलेलं पटणं जरा कठीण आहे. वर्षानुवर्षांचे संसकार (? ) झालेले आहेत ना आपल्यावर.