हृषिकेश मुखर्जींच्या चित्रपटांच्या संगीतकारांची विविधता थक्क करणारी आहे. सलील चौधरी (मुसाफिर, आनंद), शंकर - जयकिशन (अनाडी), रविशंकर (अनुराधा), लक्ष्मीकांत - प्यारेलाल (सत्यकाम), वसंत देसाई (आशीर्वाद, गुड्डी), सचिनदेव बर्मन (चुपके चुपके, मिली), जयदेव (आलाप), मदनमोहन (बावर्ची, मेमदीदी), राहुलदेव बर्मन (गोलमाल, नमकहराम). हृषिकेश मुखर्जींच्या आधीच्या चित्रपटांचे संवाद राजेंद्रसिंग बेदी आणि नंतर गुलजार लिहायचे ते चित्रपट अतिशय प्रभावी झाले होते उदा. मुसाफिर, अनुराधा, आशीर्वाद, आनंद, चुपके चुपके. पुढे गुलजार - हृषिकेश मुखर्जींची जोडी फुटल्यावर त्यांचे चित्रपट तितके प्रभावी राहिले नाहीत असे मला वाटते.
"मुसाफिर"मधले टेढी टेढी हमसे फिरे सारी दुनिया गाणे ऐका आणि पहा. यातला पेटी वाजवणारा माणूस म्हणजे गीतकार शैलेंद्र.
विनायक