शेखर माझं म्हणणं नीट बघा:
सईची घर बदलण्याची आणि तुमची देशांतरीची मानसिकता समांतर आहेत असं तुम्हाला वाटत नाही का?
मी जेव्हा सिंबायॉसिस ईंटरनॅशनल युनिव्हर्सिटीत शिकवायचो तेव्हा ‘भारताचं असं काय वैशिठ्य आहे’ असा प्रश्न तिथल्या एमबीएच्या विद्यार्थ्यांनी मला विचारला. ती सगळी संपन्न घरातली आणि सहजी कुणाला न जुमानणारी तरूण पिढी होती, ‘भारतात आता काय राहीलंय’ असा त्यांचा रोख होता. मी म्हणालो बाकी सगळं राहू द्या, एक गोष्ट तुमच्या कुणाच्या लक्षात आली नसेल, भारताची जी 'पोझिशन विथ रिस्पेक्ट टू सन' आहे ती जगातल्या कोणत्याही देशाची नाही. नुसत्या आपल्या असण्यानी हा देश निसर्गाशी इतका एकरूप आहे की आपल्याला निसर्गाचा वरदहस्त जाणवत देखील नाही. बाकीच्या देशांची उर्जा नुसती निसर्गा विरूद्ध लढण्यात आणि जगणं सुसह्य करण्यात किती खर्च होतेयं ते बघा म्हणजे तुम्हाला केवळ तुमच्या जन्मानी कोणता हिरा लाभलायं ते कळेल. केवळ निसर्गाशी मूळातच असलेल्या तादात्म्यामुळे हा देश पृथ्वीचं हृदय झाला आहे.
मी तुम्हाला सांगतो या तुम्हाला जन्मजात लाभलेल्या हिऱ्याचं मोल ओळखा, या भाग्याप्रती कृतज्ञ व्हा. जिथे असाल तिथून, जसा जमेल तसा या देशाच्या मानसिकतेला झळाळी आणण्याचा प्रयत्न करा.
रामदेवजीबाबां सारखा एखादा माणूस जर या देशाला त्याच्या स्वाभिमान परत मिळवून देण्याचा प्रयत्न करत असेल आणि तुम्हाला जरी सक्रिय सहाय्य करता येत नसेल तरी कमीतकमी इथे टिकून राहा. तुमच्या मुलांची, तुमच्या आसपासच्यांची 'या देशात आता काही राहिलं नाही' अशी मानसिकता होऊ देऊ नका.
तुम्हाला अध्यात्मिक पैलूची अजून जाण नाही किंवा तुम्ही त्याचं मोलही जाणलं नसेल पण मी अनुभवानी सांगतो आपण स्वतःच सत्य आहोत हा बोध ज्या सहजतेनी भारताच्या भूमीत होण्याची शक्यता आहे ती जगातल्या कोणत्याही ठिकाणी फार दुर्लभ आहे. हा हिरा अत्यंत दुर्मिळ आहे, तो सांभाळा.
संजय