मराठीत शिका - आणी पसायदानाचे कसायदान करा ! - ते गित आणले आहेना जय जय महाराष्ट्र माझा रिमिक्स करून तसेच पसायदान पण आणा !
शिकणे कुठल्या भाषेत ह्याला महत्त्व आहे की, आपण आपल्या मातृभाषेचा व्यवस्थित आदर / मान सन्मान करतो त्याला महत्त्व आहे ?
इंग्रजी माध्यमात शिकूनही हाताबाहेर गेलेली कार्टी मी पाहिली आहेत (मी नाही हो त्यातला) व मराठी माध्यमात शिकलेली पोरही बिघडलेली पाहिली आहेत ( हं, उदा मी !) तोच प्रकार - चांगले नांव कमावण्याऱ्या अभ्यासू किड्यांचा पण आहे.
मी मनोगतावर आल्यापासून हा येथला चौथा चर्चेचा विषय असावा (मराठी वरचा) पण लिखाण लिहिणाऱ्याने किंवा त्याला प्रतिसाद देणाऱ्याने फार कमी ठिकाणी लिहिले असेल की मी (वाचक) किंवा लिहिणाऱ्याने स्वतः मातृभाषे साठी काय केले म्हणजे तीचा व्यवस्थित प्रसार होईल. येथे हे असले चर्चा चर्वण करित बसण्यापेक्षा जरा स्वानुभवाचे बोल ऐकवा की आमच्या पिढीला ! मी इंजि च्या ३ऱ्या वर्षाला आहे (म्हणजे कॉलेजकुमार) मग आम्हाला मार्गदर्शन होईल असें काही लिहा ना.... फुकाची चर्चा करून काय फायदा ?