आपण निवांतपणे जगायला लागलो की इतरंना त्याचा त्रास व्हायला लागतो, माझी बायको म्हणाली तसं 'यांचं सगळं धाडस फक्त आराम करण्यात आहे' अशी लोकांची शेरेबाजी सुरू होते, तर याचं एकदम साधं उत्तर आहे, जर आपला उद्देशच इतरांना त्रास द्यावा असा नाही तर त्यांना होणारा त्रास हा 'त्यांना निवांत जगता येत नाही म्हणून आहे'. 

मजा अशी आहे की आनंदात प्रत्येकालाच जगायचंय पण आपण आनंदात जगतो आहोत म्हणजे अपराधच करतोयं असं वाटल्यामुळे लोक प्रत्येक गोष्ट गंभीरपणे घेतात, आणि सदैव गंभीर विषयांकडेच नजर लावून असतात.

आनंदात राहणं म्हणजे प्राप्त परिस्थितीत जे सहज आणि योग्य आहे ते करणं, दुसऱ्या कडून आपल्याला काही हवं असेल तर त्याला त्याची स्पष्ट कल्पना देणं आणि स्वतःच्या आनंदाबद्दल गिल्टी न वाटणं आहे, मग तो आनंद कायम राहतो.

संजय