याच नावाने ते ओळखले जातात. मुळचे पुण्याचे. एम एस्सी गोल्ड मेडलिस्ट पुणे विद्यापीठ. मुळचे रा. स्व. संघाचे स्वयंसेवक. पुण्यातूनच नोकरी सोडून संघाच्या कामासाठी पुर्णवेळ प्रचारक म्हणून निघाले. सुरवातीला धाराशिव (उस्मानाबाद) इथे काही काळ व नंतर सांगली जिल्हा इथे काम केले. सुमारे १० वर्षाहून अधिक काळ प्रचारक म्हणून काम केल्यानंतर संघ प्रचारक म्हणून कामातून निव्रूत्त होऊन (बहुधा १९८४) श्री शिव प्रतिष्ठान या द्वारे काम सुरू केले. छत्रपती शिवाजी महाराजाना दॅवत मानून त्यांच्या मार्गावरून चालणे हा मुख्य उदैश्य.