मित्रा,
My happiness does not depend on others being unhappy.
ह्या वाक्याला काही अर्थ आहे का? तुम्ही म्हणालात की तुम्हाला आनंद अनेक गोष्टीतून मिळतो. गाणी ऐकणे, वाचन करणे, वेगवेगळ्या प्रकारचे चांगले सिनेमे बघणे, विविध खेळ बघणे, तुमच्या कुटुंबीयांबरोबर आणि मित्रपरिवाराबरोबर वेळ घालवणे वगैरे. पण तुम्ही कधी असा विचार केला आहे का की या गोष्टी करताना तुम्ही घरातील इतरांना अन्हॅप्पी करत नाही किंवा इतरांची गैरसोय करीत नाही. उदा. जेव्हा तुम्ही गाणे ऐकता, वाचन करता वा सिनेमा बघता तेव्हा, (तुमचे काम नसतानाही) भाजी आणून बायकोचा, वडिलांचे एखादे काम करून त्यांचा त्रास कमी करू शकता म्हणजे त्याचा अन्हॅप्पीनेस कमी करू शकता. परंतु ही कामं माझी नाहीत व मी कर्तव्य म्हणून करावयाचे कोणतेही काम नाही तेव्हा मी आनंद उपभोगण्यासाठी गाणे ऐकणे, वाचन करणे, सिनेमे बघणे ही कामे करून आनंद घेऊ शकतो असे म्हणून जरी आनंद घेतला तरी तो "डिपेंड ऑन अदर्स बीइंग अनहॅपी" असा होत नाही का?
तसेच आनंदी असणे ही मानसिक अवस्था आहे. काही लोकांना कर्तव्य पार पाडतानाही आनंदच होत असतो. यात विकृती कशी असू शकते?