प्रश्न शब्द कसा आला/बनला?
प्रश्न हा शब्द बहुधा संस्कृत शब्द असावा. गूगलदेवाने प्रसन्न होऊन सांगितले की १०८ उपनिषदांपैकी एक उपनिषद 'प्रश्न' हे आहे.

तो नक्की कसा लिहायचा? (प्रश्न, प्रश्ण, प्रष्ण)
प्रश्न हा शब्द बहुधा प्रश्न असाच लिहिला जात असावा.  आम्हीतरी लहानपणापासून असाच लिहिलाय हो भोमेकाका..

बाकी मला श्  आणि ष् यांच्या उच्चारांमध्ये फरक आहे हे माहित नव्हते. आपल्या प्रश्नांपासून विषयांतर होतंय याबद्दल माफ करा. पण श (श् नव्हे) आणि ष (ष् नव्हे) यांच्या उच्चारांमध्येसुद्धा काही फरक आहे काय? उदाहरणार्थ, परेश मधला श आणि सुभाष मधला ष यांच्या उच्चारामध्ये काय फरक आहे?

-परेश