काचापाणी येथे हे वाचायला मिळाले:
एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत ज्ञान पोहोचवणे व ते टिकवण्यासाठी माणूस नेहेमीच प्रयत्नशील असतो. ते ज्ञान मौखिक स्वरूपातील असो किंवा लिखित स्वरूपातील , ज्ञानाचा वसा देण्याच्या उद्दिष्टापासून माणूस कधीही दुरावला नाही हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. ग्रंथ निर्मिती हा त्याचा सबळ पुरावा आहे. यातीलच एक मह्त्वाचा भाग म्हणजेच कोश निर्मिती होय.