एकदा मी विमानातून पूर्ण इंद्रधनुष्य व एकदा सकाळच्या वेळी ढगांवर सूर्याचे प्रतिबिंब पहिले आहे.
- वसंतराव, आठवणींना उजाळा दिलात्. धन्यवाद. महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना मी पर्वतीवर जात असे. तेथून एकदाच मला धुक्यात उगवत्या सूर्याचे प्रतिबिंब पाहाण्याचा अभूतपूर्व योग लाभला होता. तसेच, पानशेतला नोकरी करीत होतो. एका पावसाळ्यात, १९६८ साली मोपेडवरून पानशेतला जात होतो. एका डोंगरावरून पडणारा पाण्याचा धबधवा वाऱ्याच्या झोताने छत्रीसारखा आकार घेऊन हवेत विरत असल्याचा भास होई. पाण्याचे तुषार खाली येत होते, त्यांच्यावर सूर्यकिरण पडून पूर्ण गोल इंद्रधनुष्य पाहायला मिळाले होते. सारं कांही विसरून ते दृष्य पाहात खूप वेळ उभा होतो.