अंधेरी ते मालाड दोनचार वेळां पाहिले आहे. सी डी देशमुख, डॉ. राधाकृष्णन, लालबहादूर शास्त्री हेही साध्या राहणीसाठीं प्रसिद्ध होप्ते. फार दूर कशाला, मधू दंडवते केंद्रांत रेलवेमंत्री असतांना कांहीं पत्रकार त्यांच्या दिल्लीतल्या घरीं गील असतां फार उकडत असल्यामुळें हिरवळीवरच बसूं असें म्हणून त्यांनीं दोन हातांत दोन खुर्च्या उचलून हिरवळीकडे चालायला सुरुवात केली. डॉ. नारळीकर हे देखील अत्यंत नम्र आणि साधेच आहेत. कौतुक ठीक आहे पण उगाच परकीयांचीं फाजील स्तुतीकवनें नको. साधीं माणसें सगळीकडे असतात. आपल्याकडे देखील.
याउलट जगजीवन राम एकदां बोलतांबोलतां अचानक थांबून त्यांनीं आ वासला. अचानक एक नोकर पुढें आला, त्यांच्या तोंडांत औषधाच्या गोळ्या घातल्या आणि ग्लासानें त्यांच्या तोंडांत पाणी देखील ओतलें. ते गंभीर आजारी वगैरे नसतांना.
सुधीर कांदळकर