दीपतेज, अचूक उत्तराबद्दल धन्यवाद.
माझ नाव ज्ञानेश आहे. आणि v b ही अद्याक्षरे. माझे वडील पुण्याच्या ज्ञान (Jnana) प्रबोधिनी सन्स्थे च्या कोणाचेतरी मित्र असल्यामुळे लहानपणापासुनच Jnanesh असे स्पेलिंग लिहिल्या गेले. नंतर सन्स्कृत चा अभ्यास करताना 'ज्ञा' हा नवव्या गणातला धातू चालवताना (आणि 'राजन' हा अन्नंत पुल्लिंगी शब्द चालवताना) हे स्पेलिंग उच्चारशास्त्रानूसार बरोबर आहे हे पटले.
आणि मनोगत वर अकाऊंट काढताना मी नेहमीप्रमाणे jnaneshvb असे काढले. परंतू तेन्व्हा मला माहीत नव्हते कि त्याला मराठीत ट्रान्स्क्राईब केले जाईल.
बाय द वे (ह्याला मराठी?), संजयजी मी तुम्हाला एक व्य. नि. पाठविलेला आहे.